
Maharashtra Mandal Chennai
Dasara 2019
8th October 2019
" आपट्याची पाने आणि झेंडूची फुले घेऊन येत आहे विजयादशमी"
" दसरा सणाच्या शुभदिनी चला गाऊया भोंडल्याची गाणी "
नमस्कार मंडळी आपण सर्वजण नवरात्रीच्या नवरंगात रमलेले आहात.
चला तर मग भेटुया 0८ आक्टोबरला आपल्या मंडळात शमीपुजन आणि भोंडला करायला.
आणखी एक सोहळासुध्दा आहे आपल्यसारख्या जाणकार रसिक प्रेक्षकांसाठी ......
" वपुलं "
व पु काळे आणि पु ल देशपांडे या दोन समकालीन पण भिन्न शैली
असणाऱ्या लेखकांच्या लेखनाचा संगम म्हणजे वपुलं.
सगळ्या भावभावनांचा मिलाफ असलेली ही एक अभिवाचनाची मैफल आहे.
ही मैफल शब्दांची आहेच पण पु ल देशपांडे यांनी लिहलेल्या , संगीतबद्ध केलेल्या व गायलेल्या गीतांनी गुंफलेली आहे .
व पु काळे यांचा पार्टनर आणि पु ल देशपांडे यांचा असामी ही दोनही त्यांचा हेवा वाटावा अशी पात्र.
एक चौकटीच्या बाहेरचं आणि एक चौकटीत अडकलेलं ; एक माणसाचा शोध घेणारं आणि एक माणसांनी वेढलेलं.
ही दोनही पात्र एकमेकांना समोरासमोर भेटल्यानंतरचा व पु काळे आणि पु ल देशपांडे
यांच्या इतर पात्रां समवेत माणसाच्या शोधाचा केलेला प्रवास वपुलं मध्ये अनुभवायला मिळेल.
हा दर्जेदार प्रयोग सादर करणार आहेत :
ऋचा केळकर, हेमंत शिर्के, अनिरुध्द देवधर, नितिष घारे आणि शिवानी सोनार.
कार्यक्रम वेळ:
शमीपुजन : सायंकाळी ५ वाजता
भोंडला : सायंकाळी ५.३०वाजता
वपुल : सायंकाळी ६.३० वाजता.
स्थळ : महाराष्ट्र मंडळ.
दिनांक :०८ आक्टोबर २०१९.