top of page


गुढीपाडवा 2018


मराठी माणसाचे कलाप्रेम आणि रसिकता वाखाणण्याजोगी आहे, महाराष्ट्राबाहेर पडला तरी तो ही आवड जोपासत असतो.
नवनवीन कार्यक्रम मंडळात सादर होतील यासाठी आपली कमिटी सतत कार्यरत असते.
या वर्षी गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात करुया मराठमोळ्या विविध रंगी चटकदार चटपटीत भेळेसारख्या कार्यक्रमाने......
सादरकर्ते श्री. विजय कदम.
रथचक्र, हयवदन, टूर टूर, विच्छा माझी पुरी करा आणि हलकं फुलकं अशा गाजलेल्या दर्जेदार नाटकांतून ज्यांनी आपले निखळ मनोरंजन केले. असा बहुरंगी बहुढंगी कलावंत तुम्हा सर्वांची मर्हाटी लोककलेशी नाळ जोडू पाहतो आहे..... त्याच्या नमुनेदार कलावंतांसह.
तेव्हा खुमखुमी च्या आनंद जत्रेत सामील होऊ या पण आपले नेहमीचे मुखवटे बाजूला ठेवून..!
bottom of page