top of page

संतस्मरण दिन

दिनांक: जुलै 22 रविवार  ||  July 22nd Sunday

आषाढी आणि कार्तिकी एकादशीला चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या पंढरपूरात विठ्ठलभक्तीने ओथंबलेल्या भाविकांची यात्रा असते. विठ्ठल नामाच्या गजराने आसमंत दुमदुमून जातो आणि संपूर्ण वातावरणच पवित्र विठ्ठलमय होऊन जातं. महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या आपणा सर्वांना या विठ्ठल भक्तीत तल्लीन होण्यासाठी दर वर्षी आपल्याकडे "संतस्मरण दिन" कार्यक्रम केला जातो. यंदा जुलै 22ला रविवारी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, तर मंडळी या पुढे आणि झोकून द्या स्वतःला, व्हा तन्मय विठ्ठलभक्तीत!! "जय जय रामकृष्णहरि" च्या गजराने मंडळ विठ्ठलमय करून टाकू या.

Website Administrator : Aditya Apte.  

bottom of page